Jalgaon Crime । सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; जळगावातील महिलेला लावला २५ लाखांचा चुना
Jalgaon Crime । ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जळगावातही अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका महिलेला तब्बल २५ लाख रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.
जळगाव शहरातील महिलेला सायबर ठगांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून २५ लाख रुपयांची फसवणूक केली. महिलेला मुंबई सायबर पोलीस असल्याचा बनाव करून इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून धमकावले गेले.
महिलेले अटक करण्याची धमकी देत, इन्सपेक्शन फीच्या नावाखाली २५ लाख रुपये मागवले गेले. व्हाट्सअॅप कॉल, व्हिडिओ कॉल आणि मेसेजद्वारे महिलेला गोंधळात टाकून पैसे जमा करण्यास सांगितले.
भयभीत झालेल्या महिलेनं पैसे भरले, पण नंतर तिला फसवणुकीची शिकार झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तिने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.